सिनेमाआधी राष्ट्रगीत अनिवार्य करु नये अशी विनंती केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे.
यावर निर्णय देताना, थिएटरमध्ये चित्रपट सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत बंधन कारक नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं.23 ऑक्टोबर 2017 रोजी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सांगितलं होतं की, "चित्रपटगृह आणि इतर ठिकाणी राष्ट्रगीत अनिवार्य करायचं की नाही हे सरकारने ठरवावं.राष्ट्रगीत अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर अनेक घटना समोर आल्या होत्या, ज्यात काही कारणाने राष्ट्रगीताला उभं न राहिल्याने जमावाने एखाद्याला मारहाण केली होती.अशा घटना होऊ नये, यासाठी मार्गदर्शक सूचना तयार केल्या जाणार असून, यासाठी मुदत द्यावी, अशी विनंती गृहमंत्रालयाने सुप्रीम कोर्टात केली आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews